वैजापूर येथील दोन वार्डाच्या जागांसाठीची निवडणूक पुढे ढकलली

Foto
वैजापूर, (प्रतिनिधी) वैजापूर नगरपालिकासाठी पंचवीस जागांच्या निवडणुकीत दोन जागांसाठीची निवडणूक निवडणूक आयोगाने पुढे ढकलली आहे. प्रभाग क्रमांक एक अव दोन बया जागांची निवडणूक स्थगित करण्यात आली आहे. ही निवडणूक आता २० डिसेंबर रोजी होणार आहे. सून मतमोजणी व निकाल दुसऱ्या दिवशी (२१ डिसेंबर) जाहीर करण्यात येणार आहे. या दोन्ही जागांसाठी दाखल अपीलांचा निकाल जिल्हा न्यायालयाकडून २२ नोव्हेंबर किंवा त्यानंतर देण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित उमेदवारास त्याचे नामनिर्देशन मागे घेण्यासाठी वेळ मिळाला नाही.

 संबंधित निवडणूक निर्णय नाम निर्दे अधिकाऱ्यांनी अशा उमेदवारांना आपले शन पत्र माघारी घेण्यासाठी आवश्यक कालावधी न देताच निवडणूक चिन्ह वाटप केल्याचे निदर्शनास आल्याचे दिसून आल्याने आयोगाने २६ नोव्हेंबर किंवा त्यानंतर केलेली चिन्ह वाटपाची कार्यवाही कालबाह्य ठरवली आहे.

वैजापूर नगरपरिषद अंतर्गत प्रभाग क्रमांक एक अव प्रभाग क्रमांक २ ब या दोन जागांची निवडणूक स्थगित केली आहे. ही निवडणूक आता जिल्हाधिकारी यांनी चार डिसेंबर रोजी जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार होणार आहे. त्यांना दहा डिसेंबर पर्यंत अर्ज माघारी घेता येणार आहे. अकरा डिसेंबरला या उमेदवारांना चिन्ह मिळणार आहे. जागेसाठी वैजापूरच्या एक अ या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बक्ष शेख सुमैया सोहेल व शिवसेनेच्या शेख मशीरा परवीन मोहम्मद अशफाक हे उमेदवार रिंगणात असून ही जागा अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे.

 तर सर्वसाधारण प्रवर्गासाठीच्या दोन ब या जागेसाठी भारतीय जनता पक्षाचे विशाल संचेती, शिवसेनेचे संदीप बोर्डे व सागर गुंड (अपक्ष) शिव सेना पुरस्कृत हे उमेदवार निवडणूक रिंगणात होते. त्यापैकी संदीप बोर्डे यांची उमेदवारी न्यायालयाने अमान्य केली आहे. या जागेवरून दोन्ही पक्षात चांगलीच जुपंली होती. दोन्ही पक्षाकडून एकमेकांवर आरोपच्या फैरी झाडल्या गेल्या.